पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग


पुणे | पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या लवकरच अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच पुणे आणि कॅंटोन्मेंट अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णालयाच्या आयसीयू विभागातच आग लागल्याने रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणेची पळापळ झाली . शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं कळतंय. अग्निशामक दलाने काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.