हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये कलाकार सर्रास ड्रग्जचं सेवन करतात – अभिनेता अध्ययन सुमन

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय आणि एनसीबी सध्या तपास करत आहेत. याबाबत अभिनेत्री कंगणा राणावतने ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आता ब़ॉलिवूडच्या अजून एका अभिनेत्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता अध्ययन सुमनने हायप्रोफाईल पार्ट्यांबदद्ल भाष्य केलं आहे. काही हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये अनेक कलाकार ड्रग्जचं सेवन करत असल्याचा धक्कादायक खुलासा अध्ययनने केला आहे. एका मुलाखतीदरम्यान ही गोष्ट अध्ययनने सांगितली आहे. अध्ययन सुमन याच्या सांगण्यानुसार, ‘कलाविश्वामध्ये ड्रग्जचं सेवन केलं जातं ही बाब खरी आहे. अनेक हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये मी कलाकारांना ड्रग्जचं सेवन करताना पाहिलं आहे. 

या पार्ट्यांचा एकेकाळी मी देखील भाग होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी अशा पार्ट्यांना जाणं टाळतो. ड्रग्जचं सेवन फक्त बॉलिवूडमध्येच होतं असं नाही.’ नुकतंच अध्ययनने सुशांतच्या आत्महत्येवर भाष्य केलं होतं. ‘सुशांत माझा मित्र नव्हता शिवाय मी त्याला ओळखतंही नव्हतो. मात्र तरीही सुशांतचा विचार माझ्या मनात आला की अस्वस्थ होतो.’ असं अध्ययनने सांगितलं होतं.

Latest News