विवेकची बातमी ऐकून धक्का बसला: मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार

मुंबई | केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे या विद्यार्थ्याने गळफास घेतला आहे. मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझं मरण सार्थक होईल, असं विवेक रहाडे याने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आणि मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी, असं पार्थ पवारांनी म्हटलंय.

Latest News