बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे.

मुंबई | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे?, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

या अमानुष घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची आणि ते राबवण्याची गरज आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

Latest News