हाथरस: आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही

लखनऊ | आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही, असं हाथरस घटनेतील पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही, असंही पीडितेच्या भावानं म्हटलंय. या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची आम्हाला खात्री आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी पीडितेच्या भावानं केली आहे.

Latest News