उत्तर प्रदेश मधील बलात्काराचे सत्र सुरूच..आणखीन एक घटना समोर

yogi-1-1

लखनऊ | हाथरस बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणांनी आपल्या ओळखीच्या तरूणीला भेटण्यासाठी बोलावलं आणि तिच्या बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तरूणांनी गंभीर परिस्थितीत त्या तरूणीला रिक्षात बसवून तिच्या घरी पाठवून दिल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती बलरामपूर पोलिसांनी दिली.

Latest News