उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज आहे. योगीनी स्वत:च्या राज्यात लक्ष द्यावे :अनिल देशमुख

मुंबई | योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्याच राज्यामध्ये जंगलराज आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची जीभ कापण्यात आली , तसंच तिच्या पाठीचा कणा देखील त्यांनी मोडला. 10 दिवस तिचे कुटुंबीय एफआयआर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा एफआयआर देखील घेतला गेला नाही, असं अनिल देशमुख म्हणालेत. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. दिल्लीतील सफदरजंग रुगणालयात पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

Latest News