अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडलं…


लखनऊ – हाथरस बलात्कार प्रकरणाने उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली, या पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांनी तिच्या कुटुंबांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कारही केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामुळे देशभरात उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकरणात अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की, उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा संपूर्णत: नाश निश्चित आहे. या दोषींना अशाप्रकारे शिक्षा मिळेल की भविष्यात ते उदाहरण म्हणून दाखवलं जाईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे.