पुणे महापौर भाजपच्या ”मंजुषा नागपुरे”  उपमहापौरपदासाठी RPI ”परशुराम वाडेकर” यांची निवडणूक…

pmc

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -नागपुरे यांची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा हाेती. मंगळवारी अर्ज भरण्याच्या िदवशी राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस पक्षाने दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी नगरसेविका शीतल सावंत आणि उप महापौर पदासाठी दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे अाणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध होण र नाही,असे चित्र तुर्तास दिसत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होणार आहे. ही सभा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या तारखेपर्यंत तसेच सभागृहात देखील उमेदवारांना माघार घेता येते. त्यामुळे मतदान होणार की बिनविरोध निवडणूक होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेवर भाजपचे ११९ नगसेवक निवडूण आले असल्याने भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे यांचा विजय निश्चिच मानला जात आहे.

महापौरपदासोबतच उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी बैठकीत या दोन्ही नावांची अधिकृत माहिती दिली. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर कोणतेही फटाके फोडू नयेत, गुलाल उडवू नये किंवा बॅनर लावू नयेत, अशा सूचना भाजपकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याबाबत सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी मार्गदर्शन केले आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे एकूण 119 नगरसेवक निवडून आले असून पालिकेवर पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले होते. निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणावर महिलांना उमेदवारी दिली होती. एकूण 119 महिलांना संधी देण्यात आली असून त्यापैकी 50 हून अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे पुणे महानगरपालिकेत महिलांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.

भाजपच्या मंजुषा नागपुरे या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार ठरल्या आहे. भाजपकडे एकहाती सत्ता असल्याने नागपुरे यांची निवड ही केवळ औपचारिकता आहे. ९ फेब्रुवारी रोजी त्यावर अधिकृतपणे शिक्का शिक्कामोर्तब होईल.महापालिका निवडणुकीप्रमाणेच सध्याही महाविकास आघाडीतील बेबनाव दिसुन येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी कोणाताही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार नसल्याची माहिती होती. परंतु दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यासोबतच कॉंग्रेस पक्षाने देखील दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सभागृहात मतदान घेवून महापौर पदाची निवड केली जाणार आहे.

सिंहगड रस्ता भागात प्रथमच महापौर

नागपुरे यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार असून, स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त केला जात आहे. सिंहगड रोड परिसरातून प्रथमच महापौरपद मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंजूषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या पुणे महालिकेच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेतील. यापुर्वी प्रसन्न जगताप या भागातून उपमहापाैर झाले हाेते.

अनुभवाचा फायदा

मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला होता. महापालिकेतील त्यांचा अनुभव, पक्षातील कार्य आणि संघटनात्मक कामकाजाची जाण लक्षात घेता त्यांच्या नावावर एकमत झाले. मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे.

महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. योगेश टिळेकर यांना आमदारकी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांना संधी नाकारली गेली. तर मानसी देशपांडे या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे. वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

– योगिता भोसले, नगरसचिव, पुणे महापालिका.

पक्षीय बलाबल

भाजप : ११९

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २७

काँग्रेस : १५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ३

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना : ०१

Latest News