आमदार महेश लांडगे यांनी अजित सृष्टी साठी प्रयत्न करणे थांबवावे – माधव पाटील

madhav

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -आमदार महेश लांडगे यांनी अजित सृष्टी करण्याचे जाहीर करून पालिका अधिकाऱ्यांशी एक बैठकसुद्धा घेतली. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माधव पाटील यांनी महेश लांडगे यांना समाज माध्यमाद्वारे पत्र लिहून कळवले की आपण अजित सृष्टीसाठी चालवलेले प्रयत्न थांबवावेत.माधव पाटील पत्रात असे म्हणतात की आमचा देव तुम्ही तुमच्या वैयक्तिक कल्पनेच्या देव्हाऱ्यात ठेवू नका. महानगरपालिकेच्या पैशाने काय करायचे ते १२८ नगरसेवकांना ठरवू देत. हे समस्त पिंपरी चिंचवड शहराचे १२८ लोकप्रतिनिधी नक्कीच

“सर्वांना आपलंस वाटेल” असं “कामाचा माणूस, आपले अजितदादा” असे अद्वितीय स्मृतिस्थळ घडवतील. आधीच देव आणि महापुरुष राजकीय पक्षांनी आणि लोकांनी वाटून घेतले आहेत. राम कोणाचा ? गांधी कोणाचे ? वल्लभभाई पटेल कोणाचे ? हे प्रश्न आजकाल कॉमन मॅनला पडायला लागले आहेत. मोशीमधले छत्रपती संभाजी महाराजांचे ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ शिल्प ही तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखे आज समस्त पिंपरी चिंचवडकरांना वाटते.पाटील पुढे म्हणताता की निवडणुकीच्या काळात दादांबद्दल तुम्ही जे काही बोललात ते दादांना वेदना देणारे होते, दादांवरची तुमची ती राजकीय टीका अजूनही आमच्या कानात घुमत आहे. निवडणुकीतील विजयानंतर लगेचच तुम्ही माफी मागून वैर संपवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होतात. दादाही त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये म्हणाले असते ‘अरे बाबा झालं गेलं गंगेला मिळालं’ आणि विषय संपवला असता.अजितदादांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केली होती. पाटील महेश लांडगे यांना म्हणतात की तुम्हाला अजित दादांसाठी काही करायचेच असेल तर, पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या निवडणुकीत दादांनी जनतेसाठी अभ्यास करून काही स्वप्ने पहिली होती १) शहराला रोज पाणी २) ४९००० हरकतीचा, हजारो घरांवर बुलडोझर फिरवणारा प्रस्तावित डीपी रद्द करणार ३) जनतेला मेट्रो आणि पीएमपीएमएल ची सेवा मोफत करून प्रदूषणमुक्त शहर करणार. तुम्ही यासाठी पुढाकार घ्यावा, दादांची ही स्वप्ने आपण पूर्ण करावीत आणि ही कामे म्हणजेच आमच्यासाठी, तुमच्या कल्पनेतील अजित सृष्टी असेल.

यावर आमदात महेश लांडगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest News