मास्क कंपन्यांनी सरकार आणि जनतेला कोट्यावधी रुपयांना लुटलं!

The Trump administration is telling 3M to prioritize the U.S. market for its N95 respirator masks during the global COVID-19 pandemic. The company has been accused of not doing enough to support the U.S. health care system, and fostering price-gouging.

मुंबई | कोरोनाच्या संकटकाळात व्हीनस आणि मॅग्नम या दोन मास्क कंपन्यांनी सरकार आणि जनतेला कोट्यावधी रुपयांना लुटलं आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत या कंपन्यांनी 200 कोटींहून अधिक रुपयांचा नफा कमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चार सदस्यीय समिती नेमली. समितीचा अहवाल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना सादर करण्यात आला. दरम्यान, झडप असलेले एन 95 मास्क वापरू नयेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारसही समितीने केली आहे.