पुणे विमानतळावर रात्री होणारे विमानांचे उड्डाण एक वर्षासाठी बंद

pune-airport759660

पुणे : पुणे विमानतळावर रात्री होणारे विमानांचे उड्डाण एक वर्षासाठी बंद राहील. याचे कारण आहे, धावपट्टी दुरुस्तीचे आणि रस्ता बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले की, धावपट्टीवर रस्ता तयार करण्याचे काम 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे काम रात्री केले जाईल, अशा परिस्थितीत धावपट्टीवरील विमानांचे कामकाज रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान बंद केले जाईल.

कुलदीप सिंग असेही म्हणाले की, उड्डाणांचे कामकाज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सुरळीत पार पडेल. सिंग म्हणाले की, रात्री होणारी सर्व उड्डाणे आणि विमाने यांच्या वेळेत बदली केली जातील. त्यामुळे रात्रीची 10 विमान उड्डाणं आता सकाळी होणार आहेत.

Latest News