केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं निधन


बिहार | केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं आज निधन झालंय. त्यांच्यावर दिल्लीतील रूग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. चिराग पासवान लिहितात, पप्पा… तुम्ही या जगात नाहीत. पण, मला माहीत आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात.”
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. शिवाय शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं.