पुणे स्मार्ट सिटी 30 कोटींच्या एवढी मोठी रक्कम मोजता आणि कामं काय करता- अजित पवार

पुणे: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी स्मार्ट सिटी योजना लागू करण्यात येणार आहे. या कामाचा लेखाजोखा मांडण्यात येणार असून आजपर्यंत कामांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीच्या सल्लागाराला दिलेल्या 30 कोटींच्या रक्कमेवरून वातावरण चांगलेच तापले होते. सल्लागारांना एवढी मोठी रक्कम मोजता आणि कामं काय करता? असा सवाल करत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या बैठकीत भाजपचे खासदार गिरीश बापट आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामध्येही वाद झाला.

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी या बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा सादर केला. आतापर्यंत स्मार्ट सिटी योजनेसाठी मिळालेल्या 600 कोटींपैकी 421 कोटी रुपये खर्च झालेत. तर यातील 30 कोटी रुपये हे सल्लागारांवर खर्च करण्यात आले आहे, अशी माहिती कोलते यांनी दिली. सल्लागारावर 30 कोटी खर्च केल्याच्या मुद्यावरून स्थानिक आमदारांनी अनेक प्रश्न उपस्थितीत करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमदारांनी आक्रमक पवित्रा हाती घेतल्यामुळे अजितदादांनीही अधिकाऱ्यांच्या खुलाशावर नाराजी व्यक्त केली.

‘एवढे पैसे खर्च करण्यात आलेल्या सल्लागाराने आतापर्यंत काय दिवे लावले आहे. सह सल्लागार म्हणून नेमून कामे केली जात आहेत. स्मार्ट सिटीने उभारलेल्या इमारतींपासून, त्यांच्या रंगांपर्यत केलेल्या कामावर अजित पवारांनी बोट ठेवून अधिकाऱ्यांना सर्व कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच. या सर्व कामांचे ऑडिट करून त्याचा अहवाल पुढील महिन्यात सादर करण्याची आदेशही पवारांनी दिले.

Latest News