मराठा आरक्षणाला स्थगिती: 35 हजार 922 विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित

SC-students

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच रेंगाळलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या या निर्णयामुळे थांबली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त प्रवेश प्रक्रिया थांबलेली नाहीतर तब्बल 35 हजार 922 मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान, सरकारने या प्रश्नी तात्काळ एखादा मध्यममार्गी तोडगा काढून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.

Latest News