15 वर्षे काय वाटाणे सोलत होता का?-राबडी देवी

rabadi-sushi

नवी दिल्ली – जसजशी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठीचा कालावधी जवळ येत आहे, तसतसे तेथे आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. देशावर कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे सध्या बिहारमधील प्रचार हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार सुरु आहे. त्यातच एनडीए आणि महाआघाडीचे नेते सतत विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. दरम्यान लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सातत्याने टीका करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यावेळी एक ट्विट करून फसले आहेत. लो कर लो बात।

15 साल से मटर छिल रहे थे क्या?? 15 साल बाद नीतीश जी और सुशील जी को महसूस हुआ कि बिहार में बेरोज़गारी है।

तेजस्वी तुम लोग को अब मुद्दे आधारित राजनीति सिखाएगा

त्यानंतर लालू पत्नी राबडी देवी यांनी ट्विटरवर सुशील मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. काराकाटच्या एका निवडणूक प्रचार सभेत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नसल्याचे म्हटले होते. वर्तमानपत्रांमध्ये सुशील मोदी यांच्या या वक्तव्यावर बातम्या छापून आल्या. सुशील मोदी यांनी त्यापैंकी एक बातमी ट्विटरवर शेअर केली. राबडी देवी यांनी मोदी यांचे ट्विट रिट्विट करत निशाणा साधला आहे.

आता बोला.मागील 15 वर्षांपासून काय वाटाणे सोलत होतात काय?, नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना 15 वर्षांनंतर बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे समजले. आता तेजस्वी तुम्हा लोकांना मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल, असे ट्विट राबडी देवी यांनी केले आहे. राजदला 2015 च्या निवडणुकीत बिहारमध्ये 81 जागा मिळाल्या आणि हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पण हा पक्ष त्या निवडणुकीत जनता दल संयुक्तसोबत निवडणूक लढला होता. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष या विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत.

Latest News