सुनेला पतीच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालयाने

SupremeCourt_PTINew_1200

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, घरगुती हिंसा कायद्यानुसार सुनेला पतीच्या वडील-आईच्या म्हणजेच सासू सारऱ्यांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. जस्टिस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांचा निर्णय बदलला आहे. तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या बेंचने सांगितले होते की कायद्यामध्ये महिला तिच्या पतीच्या आई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाहीत. आता तीन सदस्यीय बेंचने तरुण बत्रा प्रकरणातील निर्णय बदलत 6-7 प्रश्नांचे उत्तर दिले आहे. न्यायालयाने सांगितले की, पतीच्या वेग वेगळ्या मालमत्तेतच नाही तर सामायिक घरात मुलीचा देखील हक्क आहे.

Latest News