पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही


मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. एफआयआरवर कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे. पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?, अशी टीका कंगणा राणावतने सरकारवर केली आहे. तिने या संदर्भात एक ट्विट केलंय.
माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय, असं कंगणाने म्हटलंय.