पिंपरी चिंचवडचे उपमहापौर च्या रिक्त जागेसाठी आता ६ नोव्हेंबर रोजी निवडणूक

पिंपरी: पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी आता ६ नोव्हेंबर (शुक्रवारी) रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकिसाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज महापालिकेला पाठविले आहे. उपमहापौर पदासाठी २ नोव्हेंबर रोजी

दुपारी ३ ते ५ या वेळात उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. व्हिडीओ क्वॉन्फरन्सवर  ६ नोव्हेबरला सर्वसाधारण सभेता स. ११ वाजता नवीन उपमहापौर निवडले जातील, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. वसंत बोराटे, संदीप कस्पटे, सुजाता पालांडे, बापू काटे, शितल शिंदे, माया बारणे, निर्माला गायकवाड, जयश्री गावडे, हिराबाई घुले, तुषार कामटे, शैलेष मोरे तसेच सर्वांत जेष्ठ झामाबाई बारणे यांना कुठलेही पद मिळालेले नाही. झामाताई व माया बारणे या दोघीही महापौर पदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना उपमहापौरांची संधी मिळाली तर ते स्विकारतील काय याबाबत साशंकता आहे.

Latest News