पुण्यात सासरच्या छळला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या

पुण्यात सासरच्या छळला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. दिपीका नारायणकर असे महिलेचे नाव असून या प्रकरणी पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि शामचे 19 मार्चला लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी शाम आणि त्याच्या आईने दीपिकाचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यामुळे छळास कंटाळून दीपिकाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी पती शाम नारायणकर यांच्यासह सासूविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.