राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी

udhav-66-1

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.

Latest News