पंकजा मुंडे त्यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर दसरा मेळावा घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाने कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे त्यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन वर्षाची परंपरा असलेला मेळावा कोरोना महामारीमुळे ऑनलाइन झाला. पंकजा मुंडेंनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. मात्र यावेळी जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.