राज्यपाल कोट्यातून एक जागा स्वाभीमानीला देण्याचं ठरलं होतं

raju-setti

पुणे | राज्यपाल कोट्यातून एक जागा स्वाभीमानीला देण्याचं ठरलं होतं. पण तीन महिन्यानंतर काय झालं मला माहिती नाही. आता राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नाही’, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं.

तीन महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये जात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीला देण्याचा शब्द त्यांनी दिला होता, पण आता काय झालं, मला माहिती नाही, असं राजू शेट्टी म्हणालेत.

Latest News