पुण्यात मामाचा भाच्यावर चाकूने हल्ला

दारु पिण्यासाठी 50 रुपये न दिल्याच्या रागातून मामाने भाच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास येरवड्यातील एका वस्तीत घडली.
शांताराम धोडिंबा पवार (वय 50, रा. भाजी मार्केट, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राजू भारत डोंगरे (वय 38 ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सपना डोंगरे (वय 33 ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि राजू पती पत्नी असून ते येरवड्यातील भाजी मार्केट परिसरातील इमारतीत राहतात. त्याच ठिकाणी राजूचे मामा आरोपी शांताराम राहण्यासाठी आहे.शनिवारी संध्याकाळी शांताराम घरी असताना त्याने राजूकडे दारु पिण्यासाठी 50 रुपये मागितले. मात्र, राजूने त्याला पैसे देण्यास नकार दिला.
त्याचा राग आल्यामुळे शांतारामने राजूला आणि सपनाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने राजूच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.