पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं – काँग्रेस

Pm-Modi-Nervous-mood

पाटणा | पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं, असं म्हणत काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. रणदीपसिंग सुरजेवाला पाटण्यात एका सभेत बोलत होते. सुरजेवाला यांनी यावेळी बोलताना मोदी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेत्यांना पराभव पचवता येत नाहीए. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच भाजपला पराभव दिसू लागला आहे. यामुळे पंतप्रधान, भाजप अध्यक्ष यांच्यासह सर्व भाजप नेते आपलं संतुलन आणि प्रतिष्ठा गमावून बसले आहेत, अशी बोचरी टीका सुरजेवाला यांनी केली.

वाढलेली बेरोजगारी, शेतकर्‍यांना पिकांची योग्य मोबदला न देणे, मुंगेर हत्याकांड या सर्व बाबींकडे भाजपाकडे उत्तर नाही, असं सुरजेवाला यांनी म्हटलंय.

Latest News