दीपक मारटकर हत्येप्रकरणी कुविख्यात गुंड बापू नायर याला अटक

शिवसेनेच्या कसबा विधानसभा युवा सेनेचे पदाधिकारी दीपक विजय मारटकर हत्येप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कुविख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर (रा. इंदिरानगर) याला अटक केली आहे. मोक्का कारवाईनुसार तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला कारागृहातून वर्ग करीत अटक केली.

मारटकर हत्येप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात कुविख्यात गुंड बापू नायर याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी बापू नायर टोळीतील स्वप्नील मोडवे याला अटक केली होती. दीपक मारटकर हत्येपुर्वी नायर दोन ते तीन दिवस आजारी असल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज बापू नायर याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Latest News