अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा वाद सुप्रीम कोर्टात?


अमेरिका अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीला जो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडवी लढत देत कमबॅक केले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार जो बायडन यांना 238 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले तर डोनाल्ड ट्रम्प यांना 213 वोट्स मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडूण येण्यसाठी अमेरिकेत 270 इलेक्ट्रोल व्होटसची गरज असते. ट्रम्प यांनी कमबॅक केल्यामुळे या मतमोजणीच्या सुरुवातीला बायडन यांनी घेतलेली आघाडी कमी झाली. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याचा निकाल पैन्सिलवेनिया, मिशिगन आणि विस्कोन्सीन या तीन रांज्याच्या निकालावर अवलंबून आहे.
निकालापूर्वी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडन ट्विटर वॉर
मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:ला विजयी घोषित केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानले. ट्रम्प यांनी बायडन यांना ‘फ्रॉड’ म्हणले यांच्यावर टीकास्त्र सोडले. मतमोजणी थांबवण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात जाणाच्या इशारा ट्रम्प यांनी दिला
जो बायडन यांच्या प्रचार अभियानाकडून ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. जर ट्रम्प मतमोजणी थांबवणार असतील तर आम्ही देखील सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा बायडन यांच्या टीमनं दिला.
मतमोजणी सुरु असताना विजयाची घोषणा केल्यामुळे फेसबूक आणि ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका दिला.