खडक पोलीस ठाण्यातच API आणी महिला वकिलामध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

khadak-police

खडक पोलीस ठाण्याच्या आवारातच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका महिला वकिलामध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली होती. याप्रकरणी संबंधित एपीआयविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याबद्दल खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरुद्धही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी दिली आहे.

खडक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रविवारी संध्याकाळच्या सुमारास एका महिलेशी वादावादी झाली होती. त्यामुळे प्रकरण थेट हातघाईवर आले. त्यामुळेच महिलेने सहायक पोलीस निरीक्षकावर हात उचलला होता. त्यामुळे दोघांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांसमोर साहेबांना मारहाण होत असल्यामुळे भांडणे सोडविण्याच्या उद्देशाने खडक पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदाराने महिलेला मारहाण केली आहे. मारहाणीच्या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

खडक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अधिकाऱ्यांना खोटी माहिती
खडक पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीसंदर्भात पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी बुधवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे माहिती मागितली होती. मात्र, संबंधित वरिष्ठाने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांपुढे साळसूदपणाचा आव आणला होता. मात्र, आता घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या भांडणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याची चौकशी करुन संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त

Latest News