पुण्यात महाविकास आघाडीचा प्रयोग पुणे जिल्ह्यात यशस्वी


हवेली | पुण्यात महाविकास आघाडी सरकारने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडीचा प्रयोग पुणे जिल्ह्यात यशस्वी झालाय.
हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिलाय. या पाठिंब्यामुळे हवेली पंचायत समितीच्या उपसभापती पदावर महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर विजयी झाल्यात. हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर यांच्याविरूद्ध भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव होते. हेमलता बडेकर यांनी 16 विरुध्द 3 अशा फरकाने अनिरुद्ध यादव यांचा पराभव केलाय. या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतर्फे हेमलता बडेकर यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमलता बडेकर यांना पाठिंबा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय.