नितीशकुमार भाजपबरोबर केवळ खुर्चीच्या प्रेमापोटी आहे- चिराग पासवान


बिहार | बिहार विधानसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे. नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नेहमीच विरोध केला. मात्र आज प्रचारादरम्यान त्यांच्यासोबतच मंच्यावर एकत्र येऊन सर्वत्र नतमस्तक होताना दिसले.यावर लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान म्हणाले की, “हे सर्व खुर्चीच्या प्रेमापोटी चालले आहे. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी नितीशकुमार उद्या विरोधकांपुढेही झुकलेले दिसतील”. नितीशकुमार भाजपबरोबर केवळ खुर्चीच्या प्रेमापोटी आहे, असा आरोप चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावर केला आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसोबत गळ्यात गळे घालून फिरणारे जेडीयू नेते नितीशकुमार 10 नोहेंबरनंतर तेजस्वी कुमार यांच्या समोर झुकताना दिसतील, असेही चिराग पासवान म्हणाले आहेत.