दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही, तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन दिल्लीला जाऊ


अमरावती | गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी नविन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यातच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तीन तारखेपर्यंत दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही, तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन बैतुल मार्ग दिल्लीला जाऊन आंदोलनाला पाठिंबा देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
अमरावतीत पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी संवाद साधला. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा तसेच पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला जात आहे.