पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा! पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावलं आहे.
‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ यांच्या वतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की,”मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ पुढाकार घेत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे”.
दरम्यान, महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. त्याला एक वेगळी संस्कृती आहे, संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाहीत. उलट अन्य राज्यातील उद्योगच महाराष्ट्रात येतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.