पुणे: चंदननगरमधील देशी दारूचे दुकान फोडून बॉक्स लंपास


पुणे: चंदननगरमधील देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी देशी दारूचे ६३ हजार रुपयांचे तब्बल ३२ बॉक्स चोरून नेले आहेत. या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब पुरी (वय ३०, रा. चंदननगर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगरमधील साईनगरी रस्त्यावर बाळासाहेब यांचे देशी दारू विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील ६३ हजार रुपये किंमतीचे देशी दारूचे ३२ बॉक्स चोरून नेले. बाळासाहेब दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दारूचीचोरी झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव तपास करीत आहेत.