वाकड येथील प्रभाग क्रमांक २६ मधील मुख्य रस्त्यांचे कामे कोणी अडवली?

वाकड येथील प्रभाग क्रमांक २६ मधील मुख्य रस्त्यांचे कामे कोणी अडवली? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला असेल. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना मोबाईल क्रमांकावर कॉल करुन जाब विचारा…, असा आक्रमक पवित्रा माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावर आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा मोबाईल क्रमांक : 7887880999 जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पिंक सिटी रोड, वाकड चौक, कल्पतरु सोसायटी समोरील रोड, पालाश सोसायटी, मॅक्सिमा सोसायटी समोरील विहीर, वेदांता सोसायटी येथील रस्त्याच्या अडवलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी आयुक्त हर्डिकर यांना जाब विचारावा. ज्यामुळे कोणी रस्ते अडवले? याचा उलघडा होईल, अशी भूमिका विनायक गायकवाड यांनी घेतली आहे.
*
स्थानिक नगरसेवकांचा आडमुठेपणा…
याबाबत माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले की, नगरसेविका ममता गायकवाड या स्थायी समिती सभापती असताना त्यांच्या कार्यकाळात वाकडमधील प्रमुख रस्त्यांच्या विकासाला गती देण्यात आली. त्यातील काही रस्त्यांचे कामही सुरू करुन अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी जमिनीचा ताबा दिला नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे थांबली आहेत. संबंधितांनी रस्त्याची कामे अडवली आहेत.
*
किमान लोकांचा तरी विचार करा…
वाकडमधील रस्ते अडवणारी मंडळी ही लोकप्रतिनिधी आहेत. लोकांच्या समस्या सभागृहात मांडण्यासाठी त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा विचार करुन रस्त्यांची कामे अडवू नयेत. तसेच, रस्त्यांच्या कामाचे श्रेय आम्हाला मिळतेय म्हणून रस्ते अडवून लोकांना वेठीस धरले आहे. जागेच्या भूसंपादनाचा मोबदला प्रशासनाकडून घेतला आहे. तरीही महापालिकेच्या जागेत टपऱ्या टाकून भाडे वसुली सुरू आहे. याबाबत तात्काळ भूमिका घेवून संबंधित लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हिताचा विचार करुन रस्त्यांच्या कामांची अडवणूक करु नये. अन्यथा आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत, असा इशाराही माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी दिला आहे. असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला असेल. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना मोबाईल क्रमांकावर कॉल करुन जाब विचारा…, असा आक्रमक पवित्रा माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावर आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा मोबाईल क्रमांक : 7887880999 जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पिंक सिटी रोड, वाकड चौक, कल्पतरु सोसायटी समोरील रोड, पालाश सोसायटी, मॅक्सिमा सोसायटी समोरील विहीर, वेदांता सोसायटी येथील रस्त्याच्या अडवलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी आयुक्त हर्डिकर यांना जाब विचारावा. ज्यामुळे कोणी रस्ते अडवले? याचा उलघडा होईल, अशी भूमिका विनायक गायकवाड यांनी घेतली आहे.
*
स्थानिक नगरसेवकांचा आडमुठेपणा…
याबाबत माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले की, नगरसेविका ममता गायकवाड या स्थायी समिती सभापती असताना त्यांच्या कार्यकाळात वाकडमधील प्रमुख रस्त्यांच्या विकासाला गती देण्यात आली. त्यातील काही रस्त्यांचे कामही सुरू करुन अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी जमिनीचा ताबा दिला नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे थांबली आहेत. संबंधितांनी रस्त्याची कामे अडवली आहेत.
*
किमान लोकांचा तरी विचार करा…
वाकडमधील रस्ते अडवणारी मंडळी ही लोकप्रतिनिधी आहेत. लोकांच्या समस्या सभागृहात मांडण्यासाठी त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा विचार करुन रस्त्यांची कामे अडवू नयेत. तसेच, रस्त्यांच्या कामाचे श्रेय आम्हाला मिळतेय म्हणून रस्ते अडवून लोकांना वेठीस धरले आहे. जागेच्या भूसंपादनाचा मोबदला प्रशासनाकडून घेतला आहे. तरीही महापालिकेच्या जागेत टपऱ्या टाकून भाडे वसुली सुरू आहे. याबाबत तात्काळ भूमिका घेवून संबंधित लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हिताचा विचार करुन रस्त्यांच्या कामांची अडवणूक करु नये. अन्यथा आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत, असा इशाराही माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी दिला आहे.