अशी असेल नवी संसद भवन ोकसभेत..

sansad-7

नवी दिल्ली |सध्याच्या संसद भवनाजवळ नवीन संसद भवन बांधण्याचे काम सुरू आहे. नवे संसद भवन कसे असेल, त्याचे छायाचित्र समोर आले आहे. 971 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नव्या संसद भवनचे भूमीपूजन 10 डिसेंबरला दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी ही माहिती दिली.

नवीन संसद भवनचा भूमीपूजन सोहळा 10 डिसेंबरला दुपारी 1 वाजता सोहळ्याची सुरूवात पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनाने होणार आहे. तत्पूर्वी, ओम बिर्ला यांनी पीएम मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भूमीपूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनण्यासाठी निमंत्रण दिले.

पुढे ओम बिर्ला म्हणाले, नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताचे एक असे मंदिर असेल जे राष्ट्राची विविधता प्रतिबिंबित करेल. हे जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौ. मी. मोठे असेल. त्यांनी सांगितले की, हे 971 कोटी रूपये खर्च करून 64,500 चौ. मी. क्षेत्रात उभारण्यात येईल. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला नवीन संसद भवन उभारण्याचा ठेका देण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, डिझाईन एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे.

Latest News