कृषी कायदा: मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी- शरद पवार

modi-pawar-a

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. दिवसेंदिवस आंदोलन अधिकच पेटत चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिल्ला आहे. पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. सरकारने हे गांभीर्याने घ्यायला हवं. पण केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याचं दिसून येत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सरकारची अशीच भूमिका राहिली तर हे आंदोलन दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करतील. त्यामुळे मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्लाही पवारांनी दिला आहे.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये काल पुन्हा एक बैठक झाली. मात्र  या बैठकीतसुद्धा तोडगा निघाला नसून पुढील बैठक ही 9 डिसेंबरला होणार आहे.

Latest News