कृषी कायद्यांना महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही- सुधीर मुनगंटीवार


मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच कृषी कायद्यांना विरोध करारं आघाडी सरकार महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे. महाआघाडीतील पक्षांमधील प्रेम पुतणा-मावशीचं आहे. त्यांची आघाडी 5 वर्षे नाही, तर 5000 वर्षे टिकू द्या, फक्त जनतेला जगू देत त्यांनी महाविकासआघाडीवर हल्ला चढवला
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कायद्याचा अर्थ भ्रमनिरास करण्यासाठी होतोय, ते चांगलं नाही. शेतकरी कायद्याचा अर्थ चुकीचा काढला जातोय. आधीच्या सरकारचं धोरण शेतकऱ्यांचे मरण होतं. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यात कोणताही मुद्दा पटत नसेल, तर चर्चा आणि संवाद करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने कायदा वाचला, तर अर्थ समजेल. उणीव असेल तर पंतप्रधान मोदी यांची वेळ घेऊन भेटा आणि चर्चा करा.”
भाजप महाराष्ट्र सरकार पाडणार?
भाजप राज्यातील आघाडी सरकार पाडणार का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला संताजी धनाजी स्वप्नातही दिसतो. त्यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का? तुम्ही 5 वर्षे नको, तर 5000 वर्ष टीका. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला जगू द्या आणि टिकू द्या. तुमचं प्रेम पुतणा मावशीप्रमाणे विखारी आहे”.
“मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करता, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करायचा असेल, तर मग राज्यात अध्यादेश का काढत नाही? हे नेते सत्ताप्रिय आहेत. तुमच्या कुटुंबातील कोणी मंत्री होणार नाही अशी शपथ घ्या. ते घराणेशाही चालवत आहेत,” असा घणाघातही मनुगंटीवार यांनी केला.