पिंपरी चिंचवड मधील अवैध्यरित्या धंदा करणाऱ्यांवरती कारवाई धडाका – आयुक्त कृष्ण प्रकाश

krushna-pra

पिंपरी प्रतिनिधी : कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यापासून अवैध्यरित्या धंदा करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला आहे, याचाच प्रत्यय आज हिंजवडीमध्ये पहायला मिळाला. गुप्त माहितीच्या आधारे हिंजवडी परिसरात मोठया प्रमाणात अवैध्यरित्या तंबाखू आणि गुटखा विकला जात असून आणि व्यापार होत आहे अशी माहिती मिळाली असता हि कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना मोठया प्रमाणात अवैध्यरित्या तंबाखू आणि गुटखा विकला जात होता हि माहिती मिळाल्यानंतर एक टीम तयार करुन तेथे आलो असता जेव्हा चेकिंग सुरू केली तेव्हा परसराम चौधरी मेगवाल आणि ललित गोविंदराम खारोल या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर विचारपुस सुरु केले असता तंबाखू -गुटका असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ,यामध्ये एक महिंद्रा जीतो,

इको व्हॅन ताब्यात घेण्यात आलेले आहे ,
दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून मुख्य प्रमुखआरोपी शाम चौधरी असून फरार आहे. बाकी यामध्ये आणखीन आरोपी कोण कोण यांच्याकडून माल विकत घेत आहे यांची यादी आम्हाला मिळेल आणि त्या अनुषंगाने बाकी लोकांवरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली .

Latest News