धनगर, भटक्या विमुक्तांच्या विरोधातील ठाकरे सरकार आहे – गोपीचंद पडळकर

नागपूर | राज्याचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन चालू झालं आहे. अधिवेशनाला आक्रमक सुरूवात झाल्याचं पाहायला मिळालं आहे. धनगर आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर ढोल बांधून सभागृहाच्या परिसरात आले होते. पडळकरांनी आपल्या पाठीला लावलेला बोर्ड पोलिसांनी मोडला. त्यानंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ठाकरे सरकार धनगर, भटक्या विमुक्तांच्या विरोधातील आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या समूहाच्या गरजेच्या मागण्या लिहिलेला बोर्ड पोलिसांनी मोडला. सरकारचा मी निषेध करतो. विश्वासघात करुन सत्तेत आलं असून या सरकारची दादागिरी चालू देणार नाही, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकार झोपलं असून त्याला झोपेतून उठवण्यासाठी आमच्या समाजाचं चं श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जाग करण्याचा प्रयत्न केला. ढोल वाजवणं आमली लोककला आहे कारण नसताना पोलिसांनी बोर्ड मोडला असल्याचं पडळकर म्हणाले.

दरम्यान, सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे. पण हे आम्ही चालू देणार नाही. हे मुघलांचं राज्य आहे, असंही पडळकर यांनी सांगितलं.

Latest News