आंदोलनात एकही शेतकरी नाही तर मग सरकार का आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे? – पी. चिदंबरम


नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केलं आहे. गेल्या 19 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. मोदी सरकारवर टीका होत आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडणारा सवाल केला आहे.
मंत्र्यांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी, खलिस्तानी आणि चीनचे एजंट असं म्हणलं आहे. जर तुम्ही असा आरोप करत आहात म्हणजे आंदोलकांमध्ये कोणीही शेतकरी नाही. जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही तर मग सरकार का आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे, असा सवाल पी. चिदंबरम यांनी केला आहे.
शेतकरी आंदोलनाला काँग्रेसनेही पाठींबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर अनेकवेळा राजधानीमध्ये चालू असलेल्या आंदोलनावरून टीका केली आहे.
दरम्यान, काँग्रेस सत्तेत असताना या कायद्यांची वकील करत होतं आणि आता का आरोप करत आहे?, असा सवाल सत्ताधारी नेत्यांकडून काँग्रेसला करण्यात आला आहे.