शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी कमीत कमी लाज वाटली पाहिजे- दिलजीत


नवी दिल्ली | एकीकडे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन अधिकच पेटताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगणा रााणालत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील वाद काही संपताना दिसत नाही. त्यांच्यातील ट्विटरवार अद्यापही चालू आहे. कंगणाने केलेल्या टीकेवर दिलजीतने उत्तर देत तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
माझी इच्छा आहे की, दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रा जे शेतकऱ्यांसाठी लोकल क्रातिकारकांच्या रूपात दिसले. त्यांनी कमीत कमी एका व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सांगावं की, त्यांना विरोध कशाचा करायचा आहे. दोघेही शेतकऱ्यांना भडकावून गायब झाले आणि आता शेतकऱ्यांनी आणि देशाची ही स्थिती आहे, असं कंगणाने म्हटलं होतं.
गायब होण्याचं जाऊदे….पण तुला हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला की, कोण देशद्रोही आहेत आणि कोण देशभक्त आहेत?, हा अधिकार आला कुठून? शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी कमीत कमी लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात दिलजीतने कंगणावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, दिलजीतने केलेल्या तिखट टीकेवर कंगणा राणावत काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.