कृषी कायद्याविरोधात: उपमुख्यमत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट

मुंबई : कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. महाविकास आघाडी सरकारनेसुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार यांनी ‘आज या कायद्याबद्दल प्राथमिक चर्चा होणार आहे. काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा, पण सगळ्यांशी चर्चा करू, एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही’ असं परखड मत व्यक्त केले आहे.
न्यूज18 लोकमतशी बोलत असताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘कृषी कायद्याबद्दल बैठक आज आहे, आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहे. सुप्रीम कोर्टाने पण केंद्राला सांगितलं चर्चा करा, ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा, काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. महाविकास आघाडी सरकार आहे या बिल विरोधात आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे’ असं अजितदादा म्हणाले.
‘आज प्राथमिक चर्चा होणार, आज काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा, सगळ्यांशी चर्चा करू, एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, अशी माझी वैयक्तिक भूमिका असून महाविकास आघाडीची नाही. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे, ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू, आज पहिल्याच बैठकीत काही निर्णय होणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केले.
‘310 लाख टन साखर तयार होण्याचा अंदाज आहे, तेवढी साखर परदेशात एक्स्पोर्ट केली जाणार आहे. अनुदान जाहीर केलं आहे. जो साखरेचा दर ठरवला तो वाढवावा, यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, असंही पवार म्हणाले.
‘केंद्राचे पथक आता पाहणी करण्यासाठी आले आहे. आमचा अंदाज आहे त्यात काही मदत होईल, किती होईल सांगणे उचित होणार नाही’ असं अजित पवार म्हणाले.
‘मेट्रो कारशेडबाबत, या संदर्भात आज पाच वाजता MMRDA ची बैठक आहे, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आहेत, कारशेडचं पुढे काय करायचे आहे त्याबद्दल चर्चा करूस असंही पवार यांनी सांगितले.