भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजून अनेक नेते तिकडे गेले होते. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो? असं वाटायला लागलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं सांगतानाच येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं.