पुण्यात घरकाम करणाऱ्या मोलकरणीने ज्येष्ठ महिलेला गुंगीचे औषध देऊन पैसे दागिने घेऊन फरार


घरकाम करणाऱ्या मोलकरणीने ज्येष्ठ महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोकड आणि दागिने असा 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार जेष्ठ महिला कोंढवा भागातील साळुंके विहार रस्त्यावरील सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्याकडे काही दिवसांपासून मोलकरणीन घरकामाला होती. दोन दिवसांपूर्वी मोलकरणीने जेष्ठ महिलेने पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांचे पाय दाबून देण्याचा बहाणा केला. जेष्ठ महिलेला गुंगी आल्यानंतर त्यांच्या कपाटातून हिरेजडीत सोन्याचे दागिने, 50 हजारांची रोकड असा 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सहयक पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.