चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते

a1bb65518af15a21eef453c3167aa7d0b280ebaf2cb617aff703a8808b531e84

पिंपरी – शिवसेना उपनेते व परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्या हस्ते चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे येथील नेहरू मेमोरियल हॉल याठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर बैठकीत हे प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, रघुनाथ कुचिक, पुणे संपर्कप्रमुख सुनील कदम, सत्यवान उभे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, पुणे संपर्क संघटिका शालिनी देशपांडे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, ज्ञानेश्‍वर कटके, गजानन चिंचवडे, राजेंद्र काळे, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Latest News