31 डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद भरवण्याची परवानगी द्या, पोलिसांकडे मागणी – बी. जी कोळसे पाटील


येत्या 31 डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद भरवण्याची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी त्यासाठी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी एल्गार परिषद भरवण्याचा बी जी कोळसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विचार आहे. स्वारगेट पोलिसांनी त्यांना प्राप्त झालेला अर्ज वरिष्ठांकडे पाठवला आहे. या परिषदेला परवानगी द्यायची की नाही याबाबत अजून निर्णय होणे बाकी आहे.