बिर्ला यांंची कन्या अंजली बिर्लाने आयएएसपदाला गवसणी

Backup_of_ps-final-edit

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांंची कन्या अंजली बिर्लाने आयएएसपदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे अंजलीने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. ओम बिर्ला यांची अंजली ही धाकटी मुलगी आहे. अंजलीने मिळवलेल्या यशामुळे बिर्ला कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत तरीही मुलीने आपल्या अथक प्रयत्नांनी यश खेचुन आणलं आहे. नाहीतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गरीब मुलं आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर परीक्षेत यश मिळवलेलं पाहिलं आहे.

अंजलीने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क असूनही आर्टमधून शिक्षण घेतलं. दिल्लीतील रामजस महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात ऑनर्स पदवी घेतली होती. त्यानंतर अंजलीने दिल्लीतूनच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली आणि पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं.

Latest News