धनंजय मुंडे यांचे ‘त्या’ महिलेशी परस्पर सहमतीने संबंध


पिंपरी ( परिवर्तनाचा सामना ) महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी केला आहे. या ट्वीटसोबत या महिलेनं म्हटलं, “मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस स्टेशन माझी तक्रारसुद्धा दखल करून घ्यायला तयार नाही.” तसंच, या महिलेनं आणि तिच्या वकिलानं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कथित पीडित महिलेने सांगितलं, “धनंजय मुंडे माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत. त्यांना मी 1996 पासून ओळखते. तेव्हा ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते. त्यावेळी मी 16-17 वर्षांची असेन. ते कुणीच नव्हते, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. ते मंत्री आता आहेत. 1998 साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहयचे. माझी बहीण बाळ झाल्यानंतर इंदौरला घरी गेली होती. तेव्हा घरात कुणी नसताना माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.” यावेळी या महिलेच्या वकिलाने सांगितलं की, “”कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या 10-12 वर्षांपासून पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवले. पीडित महिलेनं विरोध केल्यानं त्यांनी सिनेसृष्टीत गायिका म्हणून लॉन्च करण्याचं आश्वासन दिलं. हे बहाणे देत ते संबंध ठेवत राहिले. मात्र, लग्नाची मागणी केल्यानंतर लग्न लावून संसार मांडून देईन