शिक्षकांना आगीपासून बचावाचे प्रशिक्षण
 
                
पुणे : महाराष्ट्र  कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या   अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये सेफ किड्स फौंडेशन तर्फे आगीपासून बचाव , प्रथमोपचाराबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. 
 मिलींद  गुडदे ,चेतन साळुंखे ,योगेश गायकवाड यानी शाळेत झालेल्या आगीच्या घटना व त्यांचे परिणाम याबाबत माहिती देत या घटना टाळण्यासाठी अग्नी प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या निर्देशाचे पालन करून दरवर्षी ऑडिट करून घेण्याची गरज सांगीतली.  अशा घटना घडून आल्यास कोणत्या प्रकारे अशा अप्रिय घटनांपासून स्वतःचा व इतरांचा बचाव करावा यासंबंधी  मार्गदर्शन केले.  प्रथमोपचारची माहितीही देण्यात आली. मुख्याध्यापक  परविन शेख यांनी स्वागत केले

 
                       
                       
                       
                      