उद्यापासून पुण्यातही कोरोना लसीकरणाला सुरुवात…

las-9

पुणे । पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज (१५ जानेवारी) पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. पुण्यात या लसीकरणासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून एकूण ८ केंद्रावर लसीकरण पार पडणार आहे. दिवसाला प्रत्येक केंद्रावर १०० नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस मिळणार असून आता पर्यंत पुण्यातील एकूण ५५ हजार वैद्यकीय सेवकांची नोंदणी या लसीकरणासाठी झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या (१६ जानेवारी) वैद्यकीय सेवा देणारे सेवक, अत्यावश्यक सेवा देणारे यांना लस दिली जाणार आहे. पुण्यातील कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसुतीगृह, कोथरूड, कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, ससून सर्वोपचार रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक, नोबल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल या ठिकाणी ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. राज्यासह पुण्यातही उद्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती

Latest News